इन्फिगो आय केअर उभारणार दहा रुग्णालये – डॉ.श्रीधर ठाकूर

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
सर्वसामांन्यासाठी नवसंजीवनी ठरलेले इन्फिगो आय केअर रुग्णालयाने नुकताच वर्षपूर्ती केली असून येत्या मार्चपर्यंत इन्फिगोची दहा नवीन रुग्णालये राज्यात सुरू करण्यात येतील, अशी घोषणा यानिमित्ताने डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केली आहे. सध्या महाराष्ट्रात इन्फिगो ग्रुपची पंधरा रुग्णालये आहेत.
इन्फिगो आय केअर रुग्णालयात वर्षभरात 18 हजारांपेक्षा अधिक रुग्ण मोफत तपासले गेले. संगमेश्‍वर, लांजा, राजापूर या तालुक्यातील दुर्गम गावातील 250 नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि त्यातून 300 रुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसतील तरीही त्याच्या डोळ्यावर इन्फिगोमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते.

कोरोनाकाळात डोळे येण्याचे प्रमाण वाढले
कोरोना जसा श्‍वासावाटे शरीरात जातो, त्याप्रमाणे डोळ्यातूनही कोरोना होऊ शकतो. कोरोनाच्या काळात डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळे आल्यास मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन ड्रॉप घेतो आणि डोळ्यात टाकतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे असे सांगतानाच डोळे आल्यास तत्काळ डोळ्याच्या डॉक्टरची भेट घेण्याचे आवाहन डॉ. कामत यांनी यावेळी केले.

Exit mobile version