। पनवेल । वार्ताहर ।
घरी जाण्यावरून झालेल्या वादातून बियरच्या बाटलीने गालावर फटका मारून 37 वर्षीय तरुणाला जखमी केल्याप्रकरणी शशांक जितेंद्र कासले (राहणार कामोठे, सेक्टर 21) याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तुषार खंडाळे हा सेक्टर 20 कामोठे येथे राहत असून तो आणि त्याचा मित्र शशांक हे बिअर शॉपीमध्ये मद्य प्यायले. त्यानंतर तुषार घरी जाण्यासाठी निघाला असता आणखी मद्य पिण्यासाठी शशांक आग्रह करत होता. यावेळी तुषार घरी जाण्यास निघाला मात्र शशांक विरोध करत होता. यावेळी त्यांच्यात वाद विवाद झाले आणि भांडण चालू झाले. शिवीगाळ आणि दमदाटी करून हाताने मारहाण केली. यावेळी शशांकने बियरच्या बाटलीचा फटका तुषारच्या गालावर मारला. त्यामुळे गालातून रक्त येऊ लागले. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.