| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यात राजकीय पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामामुळे संकटात सापडला आहे. गावोगावातील विकास कामांमध्ये झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे पक्षावर जनतेचा राग जोर धरत आहे. जलजीवन पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटारे, सामाजिक सभागृह आणि इतर गावपातळीवर होणाऱ्या कामांमध्ये मनमानी निकृष्ट साहित्य वापरल्याचा आणि कामे अर्धवट राहिली असल्याचा आरोप वाढत आहे.
स्थानिक ग्रामस्थ यांनी म्हटले आहे की, ठेकेदाराला राजकीय संरक्षण मिळत असल्याने कारवाई होत नाही, ‘पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळेच निकृष्ट कामे असूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे,’ आज गावोगावी विकासकामांची बिकट अवस्था झाली आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जलजीवन योजनेतून करोडो रुपये खर्च करण्यात आले. फिल्टर आणि सोलर पॅनल जोडण्यात आलेले असताना नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. हजारो रुपयांचे विजेचे बिल भरावे लागत आहे तरीही पक्षांचे सब ठेकदार ग्रामस्थांना दबावात घेत आहेत त्यामुळे पक्षाची प्रतिमा ग्रामस्थांमध्ये बिघडली आहे. याबाबतीत अनेक तक्रारी आमसभा, आढावा बैठकीत करण्यात आल्या परंतु ठेकेदार किंवा सब ठेकेदार हा पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याला पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत ग्रामस्थ आणि नागरिकांना याबाबतीत मोठ्या प्रमाणावर असंतोष असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राजकीय पक्ष अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘जनतेच्या पैशाची लूट करून पक्षाचे कार्यकर्ते निकृष्ट विकास कामे करत आहेत. तळा तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचा अपव्यय करणाऱ्या या ठेकेदारांना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. परंतु, ठेकेदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत तिकीट दिल्यास त्याचा थेट फटका पक्षाला बसणार असल्याची चर्चा सध्या तळा तालुक्यात सुरू आहे.







