। चेन्नई । वृत्तसंस्था ।
बांगलादेशविरुद्ध चेन्नई येथे होत असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी श्रेयस अय्यरची भारतीय संघात निवड झालेली नाही. सध्या अय्यर दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ‘ड’चे नेतृत्व करत आहे. परंतु, दुलीप ट्रॉफीमध्ये अय्यरच्या बॅटमधून विशेष काही दिसले नाही. यातच आता बीसीसीआयचा नवा आदेश समोर आला आहे. ज्यामध्ये अय्यरला सध्या भारतीय कसोटी संघात स्थान नसल्याचे सांगण्यात आले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले की, सध्या श्रेयसला कसोटी संघात स्थान नाही. तो कोणाची जागा घेणार? याशिवाय दुलीप ट्रॉफीमध्ये त्याच्या शॉटची निवड हा चिंतेचा विषय ठरला आहे. तो सेट झाला होता आणि मग अचानक त्याने हा शॉट खेळला. जेव्हा तुम्ही सेट आणि सपाट ट्रॅकवर फलंदाजी करत असता तेव्हा तुम्हाला त्या संधीचा सर्वोत्तम उपयोग करणे आवश्यक असते.
अय्यरला कसोटी संघातून वगळले
