कळंबुसरे गावातील जागुत स्वयंभू शिवमंदिर

मंदिरात दर सोमवारी-श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी

| उरण । वार्ताहर |

तलावाच्या काठावर वसलेले कळंबुसरे गावातील जागुत स्वयंभू शिवमंदिर हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. या शिव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन हे गावकर्‍यांच्या सहकार्याने केले जाते. यावर्षी महाशिवरात्री उत्सव शनिवार (दि.18) रोजी आल्याने उत्सव कमिटी व ग्रामस्थांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.


तालुक्यातील कळंबूसरे हे निसर्गाच्या कुशीत विसावलेले गावे आहे. या गावाच्या सभोवताली डोंगर असून उंच टेकडीवर बसलेले कळंबूसरे गाव आहे. निर्सगाच्या सानिध्यात वसलेल्या कळंबूसरे गावात पुरातन जागुत शिवमंदिर आहे. सदर शिवमंदिर हे तलावाच्या काठावर वसलेले असून या तलावातील दगडातून पुराण काळात अनेक मुर्ती घडविण्याचे काम सुरू होते. हे या परिसरात आढळून येत असलेल्या मुर्तीतून पाहावयास मिळत आहे. या तलावाच्या ठिकाणाहून वनवासात पांडवांनी आई एकवीरा देवीच्या आशिर्वादाने श्री महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन अज्ञात वासातील आपला प्रवास ही केला आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

निसर्गाची नवलाई, मांगल्य वादाचा घंटानाद हा शिव मंदिर परिसरातून कानात घुमत राहतो. कुठूनसा एक शांत गंभीर सूर कानी पडतो तो ओम नमः शिवाय. पुरातन काळापासून भक्तांचे श्रद्धास्थान असणार्‍या स्वयंभू प्रवेश करता मनमोहक आणि तेवढीच तेजस्वी लिंग नजरेसमोर पडते. तिच्या समोर गेल्यावर मनातील व्देष, मत्सर दूर पळून मनाला एक प्रकारची तूप्ती, प्रसन्नता मिळते.

अशा या जागूत स्वयंभू शिव मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम कळंबूसरे गावातील सुरेश राऊत यांनी हाती घेतले. या मंदिराचे पुजारी म्हणून जयंत बारकू नाईक यांची पाचवी पिढी काम पाहत आहे. आणि शांततेच्या या मंदिरात दर सोमवारी तसेच श्रावणी सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. महाशिवरात्र उत्सवाप्रमाणे श्रावणी सोमवारी हरिपाठ, कीर्तन, प्रवचन तसेच संध्याकाळी आरती या कार्यक्रमाचे औचित्य ग्रामस्थांकडून करण्यात येते.

Exit mobile version