जयदीप पाटील सेवानिवृत्त

38 वर्ष केली देशाची सेवा

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील वाघ्रण या गावातील जयदीप जयवंत पाटील हे भारतीय तट रक्षक दल (इंडियन कोस्ट गार्ड ) मधून सेवानिवृत्त झाले. पाटील यांनी 38 वर्ष 2 महिने देशाची सेवा केली. त्याबद्दल त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.

वाघ्रण गावातुन शेकडोच्यावर शिक्षक, 25 पेक्षा जास्त वकील, अनेक डॉक्टर, इंजिनियर या गावाने दिले आहेत. या बरोबरच देशसेवेचे व्रत घेतलेले तरुणही या गावात पहायला मिळतात. पाटील यांच्या घरी वडील शिक्षक असताना त्याचे अनुकरण करण्याऐवजी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर देशसेवेचे व्रत घेऊन देशाची सेवा करण्याचे ठरविले. पाटील यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण जिवन शिक्षण मंदिर वाघ्रण शाळेत पुर्ण केले. दहावीपर्यंत माध्यमीक विद्या मंदीर फोफेरी, त्यानंतर मुंबईत गौरीदत्त मित्र जुनीयर कॉलेजमधे शिक्षण घेत असताना ते महाराष्ट्र नेव्हल युनीट एनसीसीमध्ये दाखल झाले. तेथे कॅडेट कॅप्टनपर्यत पोहचले. 29 फेब्रुवारी 2024 ला वयाच्या 57 व्या वर्षी प्रदीर्घ देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांना भारतमातेचे रक्षण करत असताना अनेक मेडल आणि कमंडेशन मिळाली आहेत.

Exit mobile version