। बीड । प्रतिनिधी ।
बीड येथील सर्व दलित, बहुजन समाजातील संघटनांनी एकत्र येऊन सोमवारी (दि.6) जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे गृहमंत्री अमित शाह यांना मंत्रिमंडळातून काढावे. परभणीत महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणार्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात. नोकर्यांतील खासगीकरण रद्द करावे, रिक्त जागा भराव्यात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती द्यावी. आरक्षणामधील वर्गीकरण कायदा रद्द करावा आदी मागण्यांसाठी मोर्चा निघणार आहे.