उरण । वार्ताहर ।
उरण तालुका काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी जयवंत पडते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उरण तालुका काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी जयवंत पडते यांची नियुक्ती ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश भोईर यांनी केली.
उरण काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी जयवंत पडते यांची नियुक्ती होताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आपण पक्षानी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीत तालुक्यात ओबीसी सेलची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित ओबीसी तालुका अध्यक्ष जयवंत पडते यांनी सांगितले.