| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
“माझी आणि जयंत पाटील यांची ओळख सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एका छोट्याशा कामानिमित्त झाली. त्या ओळखीचे नाते आजही तितक्याच आत्मीयतेने टिकून आहे. त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ते पदाने मोठे असले, तरी मनाने त्याहून मोठे आहेत. सत्तेपेक्षा माणुसकीला आणि राजकारणापेक्षा नात्यांना जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. संकटात धावून जाणारा, सामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आपला माणूस मानणारा नेता म्हणजे जयंत पाटील. राज्याच्या राजकारणात अशा उदार अंतःकरणाच्या नेतृत्वाची आज नितांत गरज आहे. त्यांनी स्वतःच्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्यासारखी माणसे समाजाला दिशा देणारी असतात,” असे भावनिक उद्गार आमदार नारायण पाटील यांनी काढले.







