। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
श्री विठ्ठल रुक्मिणी उत्सव सोहळ्यानिमित्त खडसांबळे येथे स्वर्गीय मंदार अशोक चोरगे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन मंगळवारी (दि.26) करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील 16 नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या 16 संघांमधून झाप संघाने बाजी मारली आहे.
या वर्षातील कबड्डी स्पर्धेच्या हंगामाचा प्रारंभ झाल्यामुळे क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत झाप विरुद्ध आपटवणे या संघात झाली होती. या लढतीत झाप हा प्रथम क्रमांकाच मानकरी ठरला असून या संघाला रोख रक्कम 11 हजार रु. व आकर्षक चषक देण्यात आले. तर, द्वितीय क्रमांक आपटवणे या संघाला रोख रक्कम 7 हजार रु. व आकर्षक चषक तसेच तृतीय क्रमांकांचा मानकरी ठरलेला चिवे संघ तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला गोमाशी संघाला प्रत्येकी 5 हजार रु. व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रेम कुडपणे, उत्कृष्ट चढाई सुमित ठाकूर, तर उत्कृष्ट पक्कड मंथन दंत, पब्लिक हिरो सूरज मगर या खेळाडूंना मंडळाच्यावतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.