| चिरनेर | प्रतिनिधी |
जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, कोळी समाज विद्या संकुलन, प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मोरा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.27) संपन्न झाला. मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी प्रास्ताविक, तर मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक रामनाथ कोळी यांनी भूषविले होते. कार्यक्रमाला जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तर व्यासपीठावर डॉ. प्रशांत पाटील, राजेंद्र कोळी, जयवंत मढवी, राजाराम पाटील, किरण शिंगटे, जविंद्र कोळी, दिलीप मुंबईकर, परशुराम कोळी आदीजण उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते रांगोळी व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पारितोषकांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षण हे महत्त्वाचं असून, ते विद्यार्थिनी घेतलेच पाहिजे, त्यासाठी अभ्यास करा, असा महत्त्वाचा सल्ला दिला. दरम्यान, राजेंद्र कोळी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित संच दिले. तर रा.ग गावंड कला, क्रीडा शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत शाळेतील 250 विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात आले. तसेच सुप्रिया मुंबईकर यांच्याकडून एक्वागार्ड देण्यात आले. सूत्रसंचालन मनोज म्हात्रे यांनी, तर आभार अनिल पाटील मानले.