हृदय विकाराच्या झटक्यामुळे गमवावे लागले प्राण
। मुंबई । वृत्तसंस्था ।
46 वर्षीय कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमार यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सोद यांनी पुनित राकुमार यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनित राजकुमार यांना छातीत दुखत असल्यामुळे बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच पुनीत राजकुमार यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.