भरसभेत खरगेंची प्रकृती बिघडली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी खरगे मंचावरून जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यांची प्रकृती थोडी ठिक झाली. त्यानंतर ते म्हणाले, आम्ही राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढू. मी 83 वर्षांचा आहे आणि इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवले जात नाही, तोपर्यंत मी जिवंत राहीन. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा येथे काँग्रेस अध्यक्ष भाषण देत होते. मोदी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, ’पीएम मोदींनी गेल्या दहा वर्षांत भारतातील तरुणांना काहीही दिले नाही. तुम्ही अशा व्यक्तीवर विश्‍वास ठेवू शकता जो दहा वर्षांत तुमची समृद्धी परत आणू शकत नाही? भाजपचा कोणताही नेता तुमच्यासमोर आला तर त्याला विचारा की त्याने काय समृद्धी आणली की नाही.

Exit mobile version