अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍याला अटक

| पनवेल । वार्ताहर ।
एका 14 वर्ष 11 महिनाच्या मुलीस फूस लावून अपहरण केल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने तपास करून मालेगाव येथून अटक केली आहे. खैरणे गाव येथून एका अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलगी वय 14 वर्ष 11 महिने हीचे फूस लावून अपहरण केलेबाबत आशयाची तक्रार पनवेल पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासानुसार आरोपी रत्नागिरी येथे असल्याची माहिती मिळाली पथक तेथे पोहोचले असता आरोपी रत्नागिरी येथून पळून गेला.

पोलीस पथकाने रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे सर्व सीसीटीव्ही. फुटेज तपास करून त्याचा मागोवा घेत घेत मनमाड, मालेगाव गाठले. सदर आरोपी हा बीफ फिशरी प्रोसेसिंग कंपनीत काम करीत असल्याने तो मालेगाव येथील बिफच्या कंपनीत काम करत असावा असा कयास करून मालेगाव मधील सर्व बिफ कंपन्या चेक केले असता आरोपी हा फायर इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट कंपनी येथे कामाला असल्याची माहिती मिळाली. मालेगाव येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाहिजे आरोपी बबुल दिलाई स्वरग्रही, वय 22 वर्ष. राह. सिपोरिया, पोस्ट.तेलिगाव, आसाम यास कंपनीच्या लेबर कॉलनी मधून ताब्यात घेऊन अपहरीत मुलीची सुखरुपपणे सुटका केली व आरोपीस अटक केली.

Exit mobile version