| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील सडे गावातून अज्ञात इसमाने 15 वर्षीय मुलाचे अपहरण केले आहे. याबाबतची तक्रार अपहृत मुलाच्या आईने पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये केली असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. सडे गावातील मयुर गोविंद सालेकर (15) या मुलाला आपल्या राहत्या घरातून दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना घडली असल्याची फिर्याद अपहृत मयुरची आई शांताबाई गोविंद सालेकर यांनी पोलादपूर पोलिसांकडे दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर व यु.एल.धुमास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार करीत आहेत.