। नवीन पनवेल । वार्ताहर ।
ओपन शूटिंग कॉम्पिटिशन स्पर्धा 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान भोपाळ मध्यप्रदेश येथे संपन्न झाली. 50 मिटर फ्री पिस्टल नेमबाजीत पनवेलचे राष्ट्रीय नेमबाज किशन खारके यांनी महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच, 20 डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली आहे.
किशन खारके यांच्या या निवडीबद्दल सिद्धांत रायफल क्लब रायगडचे पदाधिकारी प्रीतम पाटील, महेश फुलोरे, अजिंक्य चौधरी, समाधान घोपरकर, अविनाश भगत, प्रकाश दिसले, हेमंत भगत, सॅम भगत, सुरज थळे, श्रीकांत म्हसकर, सुनील मढवी, अलंकार कोळी, राजू मुंबईकर, विक्रांत देसाई, मयूर पाटील तसेंच इंडियन मॉडेल जुनिअर कॉलेज उलवे येथिल प्रिंसिपल गौरी शाह व नेरे येथील ग्रामस्थ तसेच मित्र परिवार यांनी या यशाबद्दल व निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.