उरणला कायदेविषयक जनजागृती

जेएनपीटी | वार्ताहर |
तालुका विधी सेवा समिती, उरण येथे कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी दिवाणी न्यायालय क.स्तर, उरण, येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये उरण न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश निलेश एम. वाली, दुसरे सह दिवाणी न्या. प्रियांका एन. पठाडे तसेच पराग म्हात्रे, राजेंद्र भानुशाली, प्रतिभा भालेराव व उरण न्यायालयातील विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पराग म्हात्रे, राजेंद्र भानुशाली,न्या.प्रियांका पठाडे ,दिवाणी न्यायधीश निलेश एम. वाली यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत तसेच लोकअदालतबाबत उपस्थितांना माहिती देऊन त्याचे महत्व पटवून देऊन योग्य ते मार्गदर्शन केले.

Exit mobile version