। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्री आहेत. एकापाठोपाठ एका नेत्यावर किरीट सोमय्या आरोप करत असून त्यांचे घोटोळे बाहेर काढण्याचा इशारा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखआणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता शिवसेनेचे नेते अनिल परब हे सोमय्यांच्या रडारवर आहेत. किरिट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टबद्दल ट्वीट केले आहे. या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली होती. यातील दोन नेते तुरुंगात असल्याचे सांगत उर्वरित 10 नेते तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर अनेक दिवस शांत बसल्यानंतर किरीट सौमय्या यांनी ट्वीट करत परत एकदा खळबळ उडवली आहे. सध्या किरीट सोमय्या यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.