जिल्हा भूमी अधीक्षक सुनील इंदलकर
| कर्जत | प्रतिनिधी |
आधुनिकतेचा वापर आता भूमी अभिलेख कार्यालयात पहायला मिळणार आहे. भुकर मापकाचे लाईव्ह लोकेशन मिळणार असल्याने आता थेट संवाद होऊन कामे जलत गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. रायगड जिल्हा भूमी अभिलेख विभागाने लाईव्ह लोकेशनचा वापर सुरू केल्याने नागरिकांनी त्यांचे स्वागत केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सुनील इंदलकर यांनी दिली.
भूमी अभिलेख आता कात टाकत असून, आधुनिक सुविधांचा वापर करून नागरिकांना झटपट सुविधा भूमी अभिलेख विभागाकडून दिल्या जात आहेत. त्याचा एक भाग लाईव्ह लोकेशन असल्याचे इंदलकर यांनी स्पष्ट केले. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम लागू केला आहे. ई गव्हर्नन्स यामध्ये लोकेशनल सर्विसेसचा नाविन्यपूर्ण वापराबाबत नमूद केले. त्या दृष्टीकोनातून जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सुनील इंदलकर यांच्या पुढाकाराने लाईव्ह लोकेशन सुरू करून भूमी अभिलेख विभागाकडून एक पाऊल पुढे टाकले आहे.
जमीन मोजणी साठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केल्यावर तारीख दिली जाते असे तरी अनेकदा भुकर मापक वेळेवर पोहत नाही अश्या अनेक तक्रारी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या, तर काही वेळा भुकर मापक व अर्जदार यांचा संपर्क होत नसल्याने जमीन मोजणीस विलंब होत होता. हे सर्व टाळण्यासाठी लाईव्ह लोकेशन प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. भुकर मापक यांचे मोजणी दौरा कार्यक्रमाप्रमाणे मोजणीस जाण्यापूर्वी त्यांचा थेट स्थान लाईव्ह लोकेशन संबधित अर्जदार, लगतधारक तसेच कार्यालयीन प्रमुख यांचे भ्रमणध्वनीवर व कार्यालयाचे व्हॉट्सॲप ग्रुप होणार असल्याने अर्जदार व लगत चे धारक भुकर मापक हे मोजणी अंतरापासून किती अंतर आहेत याची अचूक माहिती मिळणार आहे, तर भुकर मापक यांना दिलेल्या वेळेत पोहचता आले नाही तर भूमी अभिलेख विभागाकडून पर्यायी भुकर मापक पाठवून मोजणी करून घेतली जाईल. या प्रणाली द्वारे दैनंदिनी मोजणी कामावर नियंत्रण ठेवणेस मदत होणार आहे. सध्या लाईव्ह लोकेशन काम सुरू असून, महिन्याभरात साधारण 700 ते 800 ठिकाणी मोजणी झाल्याची माहीती जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सुनील इंदलकर यांनी दिली.