। अलिबाग । वार्ताहर ।
सर्वत्र सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसत आहे. अलिबाग तालुक्यातही असून अलिबाग समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांमुळे अलिबाग बीच नावाचे नुकसान झाले आहे. अलिबाग समुद्र चौपाटीवरील पर्यटकांसाठीची आकर्षण वस्तू असणाऱ्या ‘अलिबाग ‘ नावातील काही अक्षरांचे नुकसान झाले आहे.
सदर झालेल्या नुकसानाचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांनी पाहणी केली व सदर परिस्थिती पुन्हा पुर्ववत करणाच्या दुष्टीने निर्देश दिले. यावेळी नगरसेवक अनिल चोपडा, अमित नारे उपस्थित होते.