| महाड | प्रतिनिधी |
दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा सुतारवाडी आयोजित 12 वर्षाखालील मुलांच्या सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेत महाडच्या एसबीसी अकॅडमीने पनवेल अकॅडमीच्या संघावर 18 धावांनी मात करीत थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या महिनाभर चालू असलेल्या दिशा क्रिकेट अॅकॅडमी रोहा आयोजित सामन्यात रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य संघाने सहभाग घेतला होता. महाडच्या एसबीसी अकॅडमीचे संस्थापक बशीर चिचकर यांनी स्वतःच्या शेत जमिनीत क्रिकेटचे मैदान तयार करून आज या मैदानावर गेली अनेक वर्षे आवेश चिचकर याच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे. या अकॅडमीमधील 12 वर्षीय मुलांनी अलिबाग, माणगांव, पेण संघांना पराभूत करत सेमी फायनलमध्ये बलाढ्य अशा पनवेल अकॅडमीच्या संघाला पराभूत करत चार सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
सेमिफ़ाइनल मध्ये प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 10 विकेटच्या मोबादल्यात 112 धावांचे आव्हान दिले. यामध्ये रोशनी पारधी हिने 5 चौकार मारत 40 रनचे योगदान देत गोलंदाजीमध्येही आपली चमक दाखवून 4 षटकामध्ये 2 गडी पटकावून 21 धावा दिल्या. तर आरूष कोल्हे यांनी चार चौकार मारत 26 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या चिवट खेळीने पनवेल संघाला 120 चेंडूंत 112 रनचे आव्हान दिले. हे माफक आव्हान पनवेल संघाला पार करता आले नाही त्यांचा संघ 120 चेंडूत 94 धावाच करू शकला. रोशनी पारधी व जय बारटक्के यांच्या भेदक गोलंदाजीने एसबीसी अॅकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दिशा क्रिकेट अॅकॅडमी आयोजित रोह्याच्या मैदानावर होणार्या फायनलमध्ये थेट प्रवेश केला. सेमीफायनमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून रोशनी पारधी हिची तर क्षेत्ररक्षणामध्ये तन्मय भुवड यांची निवड करण्यात असून महाड तालुक्यात एसबीसी कॅडमीचे प्रशिक्षक आवेश चिचकर व खेळाडूंची सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. रविवारी होणार्या फायनलच्या सामन्यासाठीही अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.







