। अलिबाग । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सावनिमित्त पंचायत समिती खालापूर व ग्रामपंचायत तांबाटी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी कार्यालयात महापंचायतराज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाप्रसंगी वारस नोंदी, पती-पत्नी यांची संयुक्तपणे घरांना नावे लावणे, जॉब कार्ड काढणे, ई-श्रम कार्ड काढणे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना नोंद करणे हे उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी हद्दीतील ग्रामस्थ उपस्थित होते.