। मुंबई । प्रतिनिधी ।
बिहार येथील बुद्धगया येथे होणार्या 11व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. ने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. यावेळी पुणे शहराच्या आम्रपाली गलांडे हिच्याकडे महिला संघाचे, तर नाशिक शहरच्या आकाश शिंदे याच्याकडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने दि. 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडण्यात आलेला हा संघ मंगळवारी (दि.6)रात्री स्पर्धेकरीता प्रयाण करणार असल्याची माहिती राज्य कबड्डी असो.चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिलेली आहे.
महिला संघ:- 1)निकिता पडवळ (पुणे ग्रामीण), 2) आम्रपाली गलांडे (पुणे शहर), 3) समरीन बुरोंडकर (रत्नागिरी), 4) हरजित कौर संधू (मुंबई उपनगर पूर्व), 5) जुईली मिस्किटा (पालघर), 6)दिव्या गोगावले(पिंपरी-चिंचवड).
प्रशिक्षक :- संतोष शिर्के. व्यवस्थापिका :- डॉ. विद्या हनुमंते(पठारे).
पुरुष संघ:- 1)अक्षय सुर्यवंशी (पुणे ग्रामीण), 2) शंकर गदई (अहमदनगर), 3) सुनील दुबिले (पुणे शहर), 4) आकाश रुडले (मुंबई उपनगर पूर्व), 5)आकाश शिंदे (नाशिक शहर), 6) ऋषिकेश भोजणे (पुणे ग्रामीण).
प्रशिक्षक:- प्रताप शेट्टी. व्यवस्थापक:- सागर गोळे.