चार जणांना अटक
। कल्याण । प्रतिनिधी ।
वीज देयक थकित असल्याने घराचा वीज पुरवठा महावितरण कर्मचार्यांनी बंद केला होता. तरीही घरात चोरून वीज पुरवठा घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार्या भिवंडी तालुक्यातील कुंदे गावातील एका वीज ग्राहकावर महावितरणच्या पथकाकडून कारवाई केली जात होती. यावेळी गावातील चार जणांनी पथकाला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात महावितरण कर्मचार्याने तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारहाण प्रकरणातील कुंदे गावातील दिनेश नामदेव होगे, नरेश आगिवले, तुकाराम आगिवले, शरद पाटील या चार जणांना अटक केली आहे.