। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली, काल रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे, आतापर्यंत 4 ते 5 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
मुंबईत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत कोसळली, 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकले
