‘थॅलेसेमिया’ने त्रस्त श्रेयाच्या मदतीसाठी अनेक हात पुढे

शनिवारी हास्य नाटकाचे आयोजन
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील मंगेश चव्हाण या आर्थिक हलाखीचे जीवन जगत असलेल्या तरुणाची 11 वर्षीय लहान मुलगी थॅलेसेमिया या आजाराने त्रस्त केले आहे. श्रेया या 11 वर्षाच्या मुलीच्या थॅलेसेमिया आजारावरील उपचारासाठी असलेला काही लाखांचा खर्च लक्षात घेऊन काही संस्था पुढे येत आहेत. आर्थिक निधी गोळा करण्यासाठी ‘बाळाच्या आयचा घो’ या नाटकाचा खेळ आयोजित केला आहे. या नाटकाचे अनेक प्रयोग करण्याची इच्छा अभिनेते देवेंद्र सरकार यांनी व्यक्त केली आहे.दुसरीकडे नाटकाच्या तिकिटांची विक्री करण्यासाठी नेरळमधील अनेक तरुण मदतीला आले आहेत.

नेरळ गावातील मंगेश चव्हाण यांची 11 वर्षांची श्रेया ही मुलगी लहानपणापासून थॅलेसेमिया या आजाराची रुग्ण आहे. श्रेयाच्या जन्मापासून तिच्यावर चव्हाण कुटुंब उपचार करीत असून, मोठे ऑपरेशन डॉक्टरांनी करण्यास सांगितले आहे. त्यात चव्हाण कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांनी मदतीसाठी सर्व थरातून प्रयत्न सुरु केले आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक येथील दोन मुलींना याच आजराने ग्रासले होते. त्यावेळी देवेंद्र सरकार यांनी रंगभूमीचा आधार घेत तीन ठिकाणी नाटके सादर केली होती. तिचेवर उपचार करण्यासाठी निधी उभारण्यासाठी खारीचा वाट म्हणून दिगदर्शक देवेंद्र सरकार हे ‘बाळाच्या आयचा घो’ या नाटकाचा नाट्य प्रयोग नेरळ मध्ये सादर करणार आहेत. नेरळकरांनी पहिल्या टप्प्यात मोठी आर्थिक मदत द्यावी यासाठी मंगेश चव्हाण यांचा प्रयत्न सुरु आहे. देवेंद्र सरदार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार केलेल्या नाटकाचे अनेक प्रयोग करून निधी उभारला होता. तसाच प्रयत्न नेरळ गावातील श्रेया चव्हाण हिच्या उपचारासाठी केला जाणार आहे. मुंबई येथील एसआरसीसी या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्यावर वरील थॅलेसेमिया वरील मेजर ऑपरेशनसाठी मोठा खर्च येणार आहे.

दुसरीकडे श्रेया चव्हाणवरील शस्त्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या नाट्य प्रयोगासाठी तिकीट विक्रीची जबाबदारी पाडा भागातील तरुणांनी घेतली आहे. त्याचवेळी काही तरुण हे शस्त्रक्रियेसाठी सरकारी यंत्रणा यांच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यात तहसील कार्यालय कर्जत यांची मदत होत असून, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक वेगळी टीम काम करीत आहे. तर क्राऊड फंड गोळा करण्यासाठी मुंबई येथील टीमबरोबर बोलणे सुरू असल्याचे चव्हाण यांच्या मित्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, नेरळ गावात 24 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणारा नाटकाचा प्रयोग गर्दीचा व्हावा यासाठी अनेक तरुण काम करीत असून, नेरळ बाजार पेठ तसेच अन्य ठिकाणी तिकीट विक्री सुरू आहे.

Exit mobile version