| कोर्लई | प्रतिनिधी |
बनावट मतदार यद्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शनिवारी (दि.1) मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व सर्व मनसैनिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाध्यक्ष शैलेश खोत यांनी केले आहे. बनावट मतदार यादी विरोधात मोर्चा ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई आहे. ही खऱ्या मतदारांची लढाई आहे,खोट्या मतदारांची नाही. त्यामुळे खोट्या मतदार यादी विरोधातील या मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी व मनसेच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी शनिवारी दुपारी चर्चगेट येथे हजर राहावे, असे आवाहन उपजिल्हाध्यक्ष शैलेश खोत यांनी केले आहे.







