उलवे येथील विवाहिता बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

उलवे येथील एक विवाहित महिला राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार उलवे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुनमदेवी चौहान (40) असे विवाहितेचे नाव असून उंची 5 फुट, बांधा मध्यम, चेहरा उभट, डोळे काळे, नाक सरळ, केस काळे लांब असून अंगात निळ्या रंगाची साडी, गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, नाकात सोन्याची चमकी, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या असून तिला हिंदी भाषा अवगत आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उलवे पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार दिपककुमार पाटील (9082908143) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Exit mobile version