। पनवेल । वार्ताहर ।
अहमदनगरहून दादरला जाणार्या एसटीवरील चालकाचे नियंत्रण सुटून बसने कारला धडक दिल्याची घटना पनवेल-सायन महामार्गावर खारघर-कोपरा पूल येथे घडली आहे. एसटी बस (एमएच-13-सीयू-6863) भरधाव वेगाने जात असताना महामार्गावरील डाव्या बाजूला चालत असलेल्या कारला मागून धडक दिल्याने कार जागेवर गोल फिरली गेली आणि रस्त्याच्या उजवीकडील डिव्हायडरला धडकली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून डिव्हायडरवरील सिमेंट ब्लॉकचे तुकडे झाले आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कारमध्ये 5 प्रवासी होते. कार (एमएच-09-एफयु-2030) मुंबईच्या दिशेने जात असताना खारघर कोपरा पूल येथे हा अपघात झाला.