| पुणे | प्रतिनिधी |
पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी (दि.19) सकाळी हिंजवडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली होती. या भीषण आगीमध्ये ट्रॅव्हलमध्ये असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चार जण आतमध्ये कसं अडकले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलला सकाळी अचानक आग लागली. आतमध्ये बसलेल्या चार प्रवासांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आज सकाळी आठ वाजता हिंजवडी येथे घडली दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आगीमध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.