| खरोशी | प्रतिनिधी |
पेण शहरातील वीर हुतात्मा भाई कोतवाल चौकातील स्मृतिचिन्हासाठी सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांनी बुधवारी (दि.1) पेण नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन स्मृतिचिन्ह बसविण्याची मागणी केली होती. त्याबाबत मुख्याधिकारी यांनी मागणीची तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन लवकरच काम हाती घेण्याची ग्वाही दिली होती. त्या शब्दाला जागून त्यांनी बुधवारी (दि.8) वीर हुतात्मा भाई कोतवाल चौकात स्मृतिचिन्ह प्रस्थापित केले. शहराच्या सांस्कृतिक अभिमानाशी निगडित असलेल्या या कार्यासाठी त्यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता व कार्यदक्षता दाखवल्याबद्दल त्यांचे जीवन पाटील यांनी आभार मानले. तसेच, या कामात विशेष सहकार्य व समन्वय केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचेही आभार मानण्यात आले.







