लतादीदींचे  स्मृतीस्थळ उभारा – भाजपा

| मुंबई | प्रतिनिधी |
गानसम्राज्ञी लता मंगेशकर  यांच्या पार्थिवावर  शिवाजी पार्कवर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच  त्यांचे  स्मारक उभारावं अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे.तसे पत्र कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.याच मागणीवरुन शिवसेना खा.संजय राऊत,प्रियंका चौधरी यांनी टीका केली आहे.स्मारकाबाबतचा निर्णय हा केंद्र आणि राज्य सरकारने घेणे उचित ठरणार असून,ते त्याच जागी व्हावे,ही मागणी चुकीची आहे,असे उभयतांनी म्हटले आहे.

इंदूरमध्ये स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन केली जाईल. एक संग्रहालयही बांधले जाईल, ज्यामध्ये लताजींनी जे काही गायले आहे ते उपलब्ध असेल. इंदूरमध्येच त्यांचा पुतळा बसवला जाईल आणि दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल. – शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

Exit mobile version