। माणगाव । प्रतिनिधी ।
कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या प्रवाशाचा अज्ञात चोरट्यांनी सॅमसंग कंपनीचा 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला. सदरील घटना रविवारी (दि.27) माणगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र.2 पासून सुमारे 500 मीटर खेडबाजूकडे यादरम्यान घडली.या घटनेची फिर्याद हृतिक काशिनाथ कांबळे (वय-22) रा.विजयनगर नालासोपारा ईस्ट जि.पालघर मूळ रा.नीलवणे ता.खेड जि.रत्नागिरी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक माणगाव राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार हे करीत आहेत.







