आपत्ती व्यवस्थापन टीमला आधुनिकतेची जोड

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

नुकत्याच हरिहरेश्‍वर येथील समुद्रात लागलेल्या बोटीचे वेळी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार्‍या हरेश्‍वर येथील धाडसी तरुणांचा आमदार अदितीतटकरे यांनी हरेश्‍वर येथ सत्कार केला. त्यावेळी बोलतांना त्यांनी भविष्यकाळात अशा आपत्ती व्यवस्थापन टीमला आधुनिकतेची जोड देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे वेळी त्यांचे हस्ते सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने सत्कारमूर्ती तरुणांना लाईफ जॅकेट्सचेही वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, समन्वय समिती अध्यक्ष हिदायत कुदरते, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, सरपंच अमित खोत, उप सरपंच विजय पाटील, सदस्य सचिन गुरव, सुबोध खोपटकर, धनश्री खोपटकर आणि रुपेश मयेकर, सुयोग लांगी, बाळा कोलथरकर, विशाल जागडे, अमर कवडे, सुयोग मयेकर, आतेश भुवन, मंगेश मयेकर हे सत्कारमूर्ती उपस्थित होते.

Exit mobile version