अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस कारावास

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिनानाथ मारुती पाटील याला विशेष व अति सत्र न्यायाधीश-1, शईदा शेख यांनी दोष ठरवून 3 वर्षे शिक्षा व रक्कम रुपये 10 हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
हा गुन्हा 13 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री रामवाडी, समर्थनगर, ता. पेण यांचे घराचे गॅलरीत घडला होता. या प्रकरणातील पिडीता ही साक्षीदार 13 फेब्रुवारी 2020 रोजी एका ठिकाणी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. ती एकटीच गॅलरीमध्ये असताना ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपी दिनानाथ मारुती पाटील, (वय 45) रा. रामवाडी समर्थनगर, ता. पेण, येथे चाळीत भाडयाने राहणारा, मुळ राहणार मसदबेडी, ता. पेण, यांस माहीत असताना आरोपीने तीस पाठीमागून मिठी मारुन तिचा विनयभंग केला. यावर पिडीतेच्या आईने पेण पोलीस स्टेशनला तकार नोंदविली असता, या प्रकरणी सदर केसचा पेण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. वेडे व त्यांच्या सहकार्‍यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन मोलाचे सहकार्य केले.
खटल्यात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता स्मीता राजाराम धुमाळ -पाटील, यांनी एकूण 7 साक्षीदार तपासले व कोर्टासमोर सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. यातील साक्षीदार पेण नगरपालिका, सहाय्यक पर्यवेक्षक, आबासाहेब मनार, घटनास्थळ पंच सुरेश नागू सोनावणे, पिडीत मुलगी तसेच तपासिक अंमलदार डी. बी. वेडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई प्रियंका नागावकर, पोलीस हवालदार सचिन खैरनार, पोलीस शिपाई सिध्देश पाटील, पोलीस शिपाई पी. व्ही.कारखिले यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

Exit mobile version