। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आरोपी अजय राजेंद्र जमदाडे यास 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष व अति सत्र न्यायाधीश गईदा यांनी महत्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने आरोपीला दोषी पकडून 3 वर्षाची शिक्षा व रुपये 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.याबाबतचे वृत्त असे की, 6 ते 9 जानेवारी 2020 दरम्यान रोड, घुडरे चाळ, रुम नं. 22, आळंदी, खेड, जि. पुणे यांच्या रुम मध्ये पिडीता हिस आरोपी अजय राजेंद्र जमदाडे याने तिच्या अज्ञातपणाचा व एकटेपणाचा फायदा घेवून तिला तिच्या मर्जीशिवाय तसेच तिच्या आईवडीलाच्या कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणाकरिता फूस लावून त्याच्या मामाच्या खोलीवर पळवून नेले व तेथेच तिच्यावर खोलीमध्ये लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात मुलीचे वय 14 वर्षाचे आहे हे माहित असून सुध्दा तीला आरोपीने पळवून नेले होते हे न्यायालयासमोर सिध्द झाले आहे. त्यानुसार न्यायालयाने आरोपी अजय जमदाडे यास भादवि 363 प्रमाणे दोषी पकडून 3 वर्षाची शिक्षा व रु. 5 हजार रकमेचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणातील फिर्यादी पिडीतेच्या आईने पेण पोलीस स्टेशनला तकार नोंदविली असता या प्रकरणी सदर केसचा पेण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक संतोष पिंपळे व त्यांच्या सहकार्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन मोलाचे सहकार्य केले. सदर खटल्यात शासकीय अभियोक्ता भुषण साळवी, यांनी एकूण 3 साक्षीदार तपासले व न्यायालयासमोर सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला तसेच पैरवी कर्मचारी महिला पोलीस हवालदार प्रियंका नागावकर, पोलीस हवालदार. सचिन खैरनार, पोलीस शिपाई सिध्देश पाटील, पी. व्ही कारखिले यांचे सहकार्य मोलाचे ठरले.