कर्जतमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा सुरु

कुस्तीने स्पर्धेने क्रीडा महोत्सव सुरू

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुका पंचायत समिती आयोजित तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धांना सोमवार 4 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. तीन गटात मैदानी स्पर्धा खेळविली जाणार असून कुस्ती स्पर्धेने क्रिडा महोत्सवाला सुरुवात झाली. पंचायत समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून तालुकास्तर पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. चार सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर या कालावधीत तालुक्यातील विविध शाळांमध्ये तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धा यांची सुरुवात अभिनव प्रशाला येथे कुस्तीच्या स्पर्धेने झाली. उद्घाटन प्रसंगी शिक्षण विभागाच्या कर्जत केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन पाटील, वैजनाथ केंद्रप्रमुख सोनवणे, प्रशालेच्या उप मुख्याध्यापिका खडे पर्यवेक्षक आणि तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष भगवान धुळे, कुस्ती प्रशिक्षक गावडे यांची प्रमुख उपस्थित होती. या स्पर्धेतील नियोजन तालुका क्रीडा समन्वयक किशोर पाटील यांनी दिली. मुला मुलींच्या कुस्ती या खेळाच्या आयोजनाने करणेत आले होते. तीन वयोगटात झालेल्या कुस्ती स्पर्धेत एकूण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील 110 कुस्तीगीर खेळाडूंनी सहभाग घेतला होता.तालुका कुस्तीगीर संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत एकूण 25 खेळाडूची जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत. यावेळी कुस्ती प्रशिक्षक रमेश पाटील आणि भुसारी यांनी आयोजक पावसाळी क्रिडा महोत्सव समिती यांना सहकारी केले.

Exit mobile version