नदीतून विजेच्या खांबांची वाहतूक
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पळसधरी भागात वीज पुरवठा ज्या भागातून होतो त्या भागातील वीज इंकमर चे चार खांब हवेने अर्धवट कोलमडले होते. ते खांब नदीच्या पलीकडे असल्याने आणि त्या नदीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह प्रमाणात वाहत होता. दरम्यान, तीन दिवसानंतर त्या भागातील वीज प्रवाह पूर्ववत झाला असून त्यासाठी महावितरण विभागाने केलेली मेहनतीचे कौतुक होत आहे.
7 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे खोपोली-कर्जत रोड लगत, खोपोली इन्कमर चा प्रवाह वाहून नेणारे चार खांब कोसळले होते. 22 किलोवॅट सारखा जास्त दाबाचा विद्युतप्रवाह वाहून नेणारी विजेचे खांब कोसळले. त्यामुळे कर्जतच्या पळसदरी भागातील अनेकी गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यावेळी महावितरण चे कर्मचारी आणि अभियंते यांच्याकडून वीज प्रवाह पूर्ववत सुरु झाली. मात्र ज्या ठिकाणी विजेचे खांब कोसळले होते त्या ठिकाणी विजेचे नवीन खांब नेण्यासाठी पाहणी केली असता नवीन खांब नेने अवघड असल्याचे महावितरणच्या अधिकारी वर्गाच्या लक्षात आले. ज्या ठिकाणी विजेचे खांब बदलावे लागणार होते त्या ठिकाणी पोहचण्यसाठी नदी पार करावी लागणार होती. मात्र सुरु असलेल्या पावसामुळे ती नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. परंतु सलग तीन दिवस अन्य मार्गाने वीज पुरवठा सुरु ठेवणे कठीण असल्याने महावितरणच्या पथकाने नदी पार करण्याचे ठरवले आणि तसे नियोजन केले. त्यात कर्मचारी वर्गाने चार विजेचे लोखंडी खांब पलीकडे नेण्याचं निर्णय घेतला आणि वाहत्या नदीमधून ते दिव्य पार केले.
महावितरण कर्जत विभागातील अति. कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांनी साहित्य व मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून त्या जागी पोहचले. महावितरण तसेच एजन्सीचे कर्मचारी असे एकूण 30 कर्मचार्यांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली. भर पावसात एकूण 400 किलो वजनाचे विद्युत खांब खांद्यावर नेऊन जोराबेन येथील नदी पार करत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री पासून कामाला लागले होते. नवीन विद्युत खांब बसाविले आहेत. कामाबद्दल कर्तव्यनिष्ठा व कामाची जिद्द पाहून भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर यांनी कौतुक केले आहे.