। खरोशी । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील खरोशी येथील नारायण पांडुरंग तथा एन पी पाटील यांचे वयाच्या 57 व्या वर्षी 17 ऑगस्ट रोजी निधन झाले. गेली पंचवीस वर्ष एखाद्या शूर योद्धा प्रमाणे आजाराशी झुंज देऊन लढला मात्र मृत्यूवर विजय मिळू शकला नाही असा सकारात्मक विचारसरणीचा मनमिळावू अत्यंत प्रेमळ सर्वांचा आदर करणारा आणि खर्या अर्थाने माणुसकी जपणारा खरा मित्र आपल्यातून निघून गेल्याने खरोशी गावावर दुःखकळा पसरली आहे. सप्टेंबर 2021 या महिन्यात सेवानिवृत्त होऊन सुखाने जीवन जगता येईल अशी आशा मनाशी बाळगून असलेले नारायण पाटील हे आपल्यातून निघून गेल्याने मन अतिशय दुःख झाले. अनेक मित्रांना त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात अश्रूंचा बांध फुटलेला पाहावयास मिळाला.