| उरण | वार्ताहर |
डोंबिवली येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी साई संस्थेच्या शाळेचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभनेत्री किशोरी आंबिये, विजय पाटकर, जयवंत भालेकर, नाथा, कला दिग्दर्शक विशाल सावंत उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी अभिनेता विजय पाटकर म्हणाले, कमी शुल्कात विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा दिशादर्शक म्हणजे नारसु पाटील.
डोंबिवलीमध्ये शिक्षण क्षेत्रात ज्यांच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. प्रसिद्ध उद्योजिका राजश्री गायकवाड सारखी विद्यार्थी याच शाळेने घडविले आहे. प्रत्येक पालकाने याच संस्थेत मुलांचे प्रवेश घ्यावे, असे मी स्वाभिमानाने सांगू इच्छितो. आपल्या मुलांचे भवितव्य नरसू भाईच्या हाती सुरक्षित आहे याची मी आपल्याला ग्वाही देतो, असे गौरवोद्गार सिने अभिनेते विजय पाटकर यांनी काढले.
यावेळी व्यासपीठावर पद्मिनी पाटील, डॉ प्रणाली पाटील, सोनाली पाटील, शाळेची माजी विद्यार्थिनी उद्योजक राजेश्री गायकवाड, विशाल सावंत, बिजक्षी राय, ऑडिटर संदीप जाधव, विनोद पाटील, गोपाळ लांडे, संस्थेचे सर्व मुख्याध्यापक हजारो पालक व विद्यार्थी उपस्थित होते.