। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व त्यांचे पूजन करून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली.
या कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे, आय.क्यू.एस.सी. विभाग प्रमुख प्रा. केतकी पाटील, भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. दिनेश पाटील, शलाका पंडित तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रंथालयाच्या विभाग प्रमुख कांचन म्हात्रे यांनी केले.