नवगाव नारळफोडी स्पर्धा

आरुष भगत विजेता

| अलिबाग | प्रतिनिधी |

नवगावमधील श्री एकविरा देवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडीची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत आरुष भगत विजेता ठरला असून त्याला प्रथम क्रमाकांचा पारितोषिक देण्यात आले.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद घासे, व्हाईस चेअरमन सुभाष लाकडे सुभाष लाकडे, गजानन लाकडे, सुरेंद्र कटोर, जनार्दन सुरेकर, प्रकाश वाघे, राजेंद्र ठाकूर, संदीप कवळे, प्रमोद कवळे, रमेश शेळके, निखिल कवळे, विकास शेळके, रमाकांत राऊत, ठाकरे गटातील ठाणे शाखा प्रमुख रविंद्र कवळे, आदी मान्यवरांसह पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारळ फोडी स्पर्धेत आरुष भगत याने प्रथम क्रमांक, विकी दखणे याने द्वीतीय व हर्षद कवळे तृतीय व गौरव कवळे यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. या सर्व विजेत्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version