। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील पुई ,पहूर, तळवली तर्फे अष्टमी, खैरखुर्द व दापोली ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाल्याचे दिसून येत आहे.
निकालानंतर पुई ग्रामपंचायत सरपंच म्हणून वृषाली मांडलुसकर,खैरखुर्द सरपंच म्हणून मुजमिल गिते, तळवली तर्फे अष्टमी सरपंच म्हणून रविंद्र मरवडे, पहूर सरपंच म्हणून दिपाली खांडेकर तर दापोली सरपंच म्हणून बाळाराम मोरे विजयी झाले आहेत. खैरखुर्द ग्रामपंचायतीमध्ये रेश्मा गायकवाड, शैला वाघमारे, भगवान यादव यांची शेकाप सदस्य म्हणून तर दापोली ग्रामपंचायतीत हरेश म्हात्रे व आशा सरणेकर विजयी झाले असून सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.