| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्वप्नील राऊत (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांनी मोहोपाडा मरिआई मंदिरात मोहोपाडा 18 वर्षांवरील नवमतदारांसाठी मतदार नोंदणी मोहीम राबविली होती. या मोहिमेत 181 नवमतदारांनी आपल्या नावाची नोंदणी केली. यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक दोन मधील मोहोपाडा, मोहोपाडावाडी, शिंदीवाडी, पंचशील नगर येथील अधिक तरुणांनी नावनोंदणी करुन मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी नोंद केली.
या शिबिराला अनेकांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश म्हात्रे, विभागप्रमुख अजित सावंत, माजी सरपंच रोशन राऊत, माजी उपसरपंच रामचंद्र मुंढे, शहरप्रमुख संतोष पांगत, उपशहरप्रमुख अनिल खराडे, माजी सदस्य भाग्यश्री पवार, अशोक म्हात्रे, भालचंद्र राऊत, केदार भोईंंर, शंकर भोईर, राजेश सोले, प्रशांत मोकाशी, योगेश राऊत, अमित राऊत, दर्शन माळी आदींसह उध्दव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.