। माणगांव । प्रतिनिधी ।
भारत देशात भरपूर मनुष्यबळ आहे. सुशिक्षित युवक देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, त्यांना रोजगार आणि नोकर्या उपलब्ध नाहीत. त्यासाठी प्रत्येक शाळेत किमान कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. भारतात नोकर्यांची कमी नाही. परंतु, कुशल कामगार नसल्याने नोकर्या उपलब्ध होत नाहीत. यासाठी प्रबोधन कौशल्य निकेतन मार्फत तळागाळातील गोरगरीब विध्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत. या रोजगार संधीमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे. येथील एकही विध्यार्थी बेरोजगार राहणार नाही, हि प्रबोधन व पहेलची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन माणगांव येथील प्रबोधन कौशल्य निकेतन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र सिमलेस लि. अधिकारी शिवकुमार जिंदाल, मानव संसाधन उपप्रमुख आत्मकुमार चक्रपाणी, रोहा औद्योगिक क्षेत्र चेअरमन भारदेस्कर, प्रबोधन गोरेगाव अध्यक्ष नितीन शिंदे, प्रबोधन संचालक डॉ. संतोष कामेरकर, पहल अंकुश भारद्वाज, नगरसेवक अजित तार्लेकर, डॉ. परेश उभारे, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन मंगेश डफळे, विध्यार्थी, पालक, ई. उपस्थित होते. यावेळी विध्यार्थी व पालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.