। सारळ । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात संपूर्ण गावाने एकत्र येऊन साजरा केला जणारा सार्वजनीक गणेशउस्तव फार दुर्मिळ आहे. 64 वर्षाची परंपरा असणारा सारळचा सर्वजनिक गणेश उस्तव म्हणजे फक्त गावासाठी नव्हे तर आजूबाजूच्या गावांसाठी देखील अकर्षणाचा विषय आहे. त्याचे कारण म्हणजे गावात अठरा फगड जाती आहेत. यात माळी, कोळी, आगरी यांचे प्राबल्य असले तरी सोबत इतर जाती असणारा एकोपा हा इथे बघण्यासारखा आहे. गोविंदा, होळी सत्यनारायण पूजा आणि गणपती हे उत्सव येथे पूर्ण गाव एकत्र येत साजरे करत असतो. गणेशोत्सवादरम्यान नेसर्गिक असणारी सजावट, विविध स्पर्धांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. तसेच, गणेश विसर्जनासाठी संपूर्ण गावाचे ग्रामस्थ शिस्तबद्ध रीतीने टाळ, ढोलकी व भजनाच्या गजरात मिरवणुकीत सामील होत असतात. तसेच, गणेश विसर्जनानंतर समुद्र किनार्याची स्वच्छता करण्यासाठी गावातील तरुणाईन पुढाकार घेत असते.