राजकारणासाठी धर्मनिरपेक्षतेचा नाममात्र वापर….

केंद्रीयमंत्री मुख्तार नक्वी यांचे विरोधकांवर टिकास्त्र
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना, विरोधी पक्ष त्यांच्या राजकीय फायद्यासाठी धर्मनिरपेक्षता तत्त्वाचा वापर करत आहेत. काही लोकांनी धर्मनिरपेक्षता हा शब्द केवळ राजकीय फायद्यासाठी वापरला आहे, असे म्हणत विरोधकांवर टिकास्त्र डागले आहे.
याप्रसंगी अल्पसंख्याकांच्या बाबतीतील सरकारची असलेली भूमिका सिद्ध करण्यासाठी माहिती देताना ते म्हणाले की, मोदी सरकारच्या गृहनिर्माण प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या दोन कोटी लोकांपैकी 31 टक्के अल्पसंख्याक आहेत, तर किसान सन्मान निधी मिळणार्‍या 12 कोटी शेतकर्‍यांपैकी 33 टक्के अल्पसंख्याक आहेत. धर्मनिरपेक्षता ही भाजपाची घटनात्मक आणि राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

Exit mobile version