। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत परिमंडळ 1 व परिमंडळ 2 येथील पोलीस ठाण्यामध्ये महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात येते. सदर महिला दक्षता समितीवर नेमणूक करण्यात येणारे सदस्य हे बिगर राजकीय, क्रियाशील, समाजाची विश्वासाहर्ता प्राप्त झालेल्या व महिलांच्या कल्याणासाठी काम करणार्यांची नेमणूक करावी, असे आदेश काढून पूर्वी असलेल्या महिला दक्षता समितीची पुनश्चः स्थापना करावी, अशा प्रकारचे आदेश सुद्धा काढण्यात आले आहेत.
यापूर्वीच्या महिला दक्षता समितीमध्ये प्रामुख्याने विविध पक्षातील राजकीय महिलांचा समावेश होता. व त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्या अनुषंगाने विविध तक्रारी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे गेल्याने यापुढे महिला दक्षता समितीचे प्रमुख म्हणून पोलीस अधिकार्यांसह या समितीमध्ये 5 महिला समिती सदस्य फक्त राहणार आहेत. नेमणूक झालेले सदस्य हे बिगर राजकीय, क्रियाशील, समाजाची विश्वासाहर्ता प्राप्त झालेले असतील अशा प्रकारचे आदेश काढण्यात आलेले आहेत.