। वेनगाव । वार्ताहर ।
निसर्ग सामाजिक संस्था, कोरो इंडिया आणि तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, डॉ.बा.सा.को.कृ.वि. बांद्रा-मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने “मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या संधी“ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा कलम-नारळाची वाडी येथे संपन्न झाली. यावेळी संशोधन केंद्रातील सहभागी शास्त्रज्ञ डॉ. भरत यादव यांनी ‘शोभिवंत मत्स्यपालन’ या विषयावर, तर जीवशास्त्रज्ञ रविंद्र बोंद्रे यांनी ‘जलाशयातील मत्स्य पालन, पिंजर्यातील मत्स्यशेती’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करून माहिती दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना निसर्ग सामाजिक संस्थेच्या साचिव सपना रोकडे यांनी केली. सुत्रसंचलन अध्यक्षा विशाखा वाघचौरे यांनी केली. कार्यक्रमाच्या आयोजक सुनिता काबडी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना संविधानाची उदेशीका भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेच्या कार्यक्रमास बहुसंख्या महिला उपस्थित होत्या.