ज्ञानमंदिरे उघडा! नको रे बाबा हे ऑनलाईन शिक्षण

पालकांचा नाराजीचा सूर, पाल्याच्या भविष्याची चिंता
। अलिबाग । वैभव पाटील ।
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच राज्यातील ज्ञानमंदिरे पुन्हा बंद करुन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले खरे, पण या ऑनलाईन शिक्षण पद्धतीलाच आता पालकांचाच विरोध होऊ लागला असून,विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंतेने हे पालक ग्रासले आहेत.

पुन्हा नव्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृुष्टीने शासनाने इ.1 ली ते 9 वी व 11 वी चे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शाळा पुर्णतः बंद झाल्याने पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे. सुमारे दीड वर्षानंतर दीपावली नंतर सुरक्षिततेचे नियम पाळत हळूहळू सर्वत्र शाळा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी अभ्यासात रमले होते.

ऑनलाईन शिक्षण थांबून प्रत्यक्षात अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी सहभागी झाल्याने शैक्षणिक कार्य करताना शिक्षकांनाही दिलासा मिळाला होता. तर पालक वर्गही सुखावला होता. एकंदरीत परिस्थिती रूळावर आली असतानाच पुन्हा नव्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागल्याने अखेर शासनाने शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचे पालकांनी जरी सहमती दर्शवली असली तरी शाळाच बंद झाल्याने आपल्या मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या भविष्याची चिंता त्यांना सतावू लागली आहे.

अशावेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या प्रक्रियेकरिता मोबाईलची व्यवस्था होत नसल्याने मोठीच समस्या निर्माण होते. याशिवाय नेटवर्क समस्याही निर्माण होते.त्याचबरोबर असल्याचे पहावयास मिळत असल्याने ऑनलाईन शिक्षण अश्यकच.

ज्या ठिकाणी नेटवर्क नाही ते़थे शिक्षक जाऊन त्या विद्यार्थाना शिकविण्याचे काम करत आहेत. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आमच्याकडून घेतली जात आहे.

ज्योस्ना शिंदे, शिक्षणाधिकारी रायगड

विद्यार्थी एकदा मोबाईलमध्ये गुंतले की, अभ्यासाच्या नावावर मोबाईलवर गेम खेळणे किंवा अन्य मनोरंजक गोष्टीसाठी विद्यार्थी मोबाईल वापरित असल्याने तिथूनही पालकांची डोकेदुखी निर्माण होते.एकंदरीत आँनलाईन शाळांमुळे पालकांच्या चिंतेत अधिक भर पडते.

मंगेश घरत, पालक

ऑनलाईन शिक्षणामुळे पालक कामावर गेल्यावर मुल्याकडे मोबाईल नसल्यामुळे त्याच्या शिक्षणात थोड खंड पडत आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षणात थोडा आडथळा निणार्ण होऊ शकतो.

जगदीश पाटील, सहाय्यक शिक्षक, सारळ, माध्यमिक शाळा सारळ



Exit mobile version